मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरच्यांनी दारूसाठी पैसे दिले नाहीत रागात केलं भयानक कृत्य, छत्रपती संभाजीनगर हादरले!

घरच्यांनी दारूसाठी पैसे दिले नाहीत रागात केलं भयानक कृत्य, छत्रपती संभाजीनगर हादरले!

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad Cantonment, India

अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर), 22 मार्च : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच पैठण तालुक्यातील एकाने दारूसाठी आपलाच कापसू पेटवून दिला आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव या गावातील आहे. भाऊसाहेब आणासाहेब सांगळे या व्यक्तीने हा प्रकार केला. घरातील लोकांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे दारूच्या नशेत घरात असलेला कापूस पेटवून दिला आहे.

पुन्हा पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो, 'या' पद्धतीनं घ्या पिकांची काळजी

यामध्ये 15 ते 20 क्विंटल कापूस जळाला असल्यामुळे या शेतकऱ्याचे दीड ते पावेदोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरामध्ये देखील असणारे घरगुती साहित्य जळून खाक झाले.

अब्दुल सत्तारांचे वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या आठवडाभरात सहा शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा हा जिल्हा आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्या होत असल्यानं छत्रपती संभाजीनगर सध्या चर्चेत आलं आहे.

दरम्यान शेतकरी आत्महत्येवर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करतात असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

ठरलं! या मतदारसंघातून आठवले लढवणार निवडणूक; म्हणाले भाजपनं...

नेमकं काय म्हणाले सत्तार? 

मी आज सोयगावला जाऊन पाहणी केली. प्राथमिक नुकसानभरपाई 13 हजार आली होती. आता हा आकडा 37 हजार इतका आहे. परंतु हा अंतिम अहवाल अद्याप सरकारकडे पाठवण्यात आलेला नाही. मी माझ्या मतदार संघात फिरून आलो, शेतीचे फार नुकसान झालेले नाही. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टीम बनवण्यात आली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Aurangabad News, Crime news