मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तृतीयपंथीसोबत राहणं पडलं महागात; 'तो' हट्ट पुरवला नाही म्हणून तरुणाला आयुष्यातून उठवलं, हिंगोलीतील भयंकर घटना

तृतीयपंथीसोबत राहणं पडलं महागात; 'तो' हट्ट पुरवला नाही म्हणून तरुणाला आयुष्यातून उठवलं, हिंगोलीतील भयंकर घटना

हिंगोलीमध्ये तरुणाची हत्या

हिंगोलीमध्ये तरुणाची हत्या

हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hingoli, India

हिंगोली, 1 एप्रिल, मनीष खरात : हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तृतीयपंथीयाने तरुणाची हत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशोक गजानन आठवले असं मृत तरुणाचं नाव आहे. अशोक त्याच्यासोबत लग्न करत नसल्यानं या तृतीयपंथी व्यक्तीनं त्याचा गळा आवळून खून केला. मृत अशोक गजानन आठवले हा हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील मूळ रहिवासी असून, हिंगोली शहरात काही महिन्यांपासून तो ऑटो चालवण्याचे काम करत होता.

लग्न न करण्यावरून वाद  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीत एका तृतीयपंथीयाने सोबत राहणाऱ्या युवकाचा माझ्यासोबत लग्न का करत नाही? या कारणावरून गळा आवळून खून केला आहे. शहरातील खुशाल नगर भागात ही घटना घडली आहे. अशोक गजानन आठवले असं मृत तरुणाचं नाव आहे.  अशोक गजानन आठवले हा हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील मूळ रहिवासी असून, हिंगोली शहरात काही महिन्यांपासून तो ऑटो चालवण्याचे काम करत होता. हिंगोली शहरातील खुशाल नगर भागात राहायला आल्यानंतर याच परिसरात राहणाऱ्या प्रिया उर्फ दिपक नरसिंग तुरमळू या तृतीयपंथीयाशी अशोकची ओळख झाली. त्यानंतर अशोकने प्रिया उर्फ दिपककडेच राहायला सुरुवात केली.

उचल देतो म्हणून लॉजवर बोलवले अन्.., ऊसतोड महिला मजुरासोबत मुकादमाचे राक्षसी कृत्य, बीडमध्ये खळबळ

गुन्हा दाखल  

यानंतर प्रिया उर्फ दीपक याने अशोककडे लग्न करण्यासाठी तगादा लावला, अशोकने लग्नास नकार दिला. त्यामुळे परवा 30 मार्च रोजी प्रिया उर्फ दीपक या तृतीयपंथीयाने शेख जावेद या आरोपीसोबत संगणमत करून अशोकचा गळा दाबून खून केला. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी अशोकने गळफास घेतल्याचा बनाव करत त्याला रुग्णालयात देखील दाखल केले.  अशोकच्या नातेवाईकांनी तृतीयपंथी प्रिया व शेख जावेद या दोघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos