मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई, पुण्यासह राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, कमी दाबाचा पट्टा सक्रीय

मुंबई, पुण्यासह राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, कमी दाबाचा पट्टा सक्रीय

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

मुंबई, 24 मार्च : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आजपासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे, नाशिक, नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासह विदर्भावर अधिक परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा पुढचे काही दिवस सक्रीय असल्याने राज्याती बहुतांश जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल झला आहे. दरम्यान काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.  तर मराठवाडामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात मुसळधार होण्याची शक्यता आहे.

हापूस आंब्याचे सांगलीत आगमन, पाहा एका पेटीला किती मिळाला भाव

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. 24) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कोकणातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात सध्या दिवसा उन्हाळा रात्री जोरदार थंडी पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा वाढत आहे. दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 36.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह देखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर येथे, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान राज्यातील मागच्या 24 तासांत पुणे 31.1 (16.3), जळगाव 34.0 (19.0), धुळे 33.0 (14.0), कोल्हापूर 34.3 (19.0), महाबळेश्वर 27.3 (13.8), नाशिक 30.5 (17.0), निफाड 31.5 (13.6), सांगली 33.4 (18.7), सातारा 33.0 (16.6), सोलापूर 35.2 (20.0), सांताक्रूझ 31.6 (22.8), डहाणू 31.3 (21.8), रत्नागिरी 32.5 (22.4), छत्रपती संभाजीनगर 31.6 (18.7), नांदेड 34.4 (20.0). 

Hapus Mango Rate : दरवर्षी भाव खाणाऱ्या हापूस आंब्याचे दर यंदा कमी का आहेत? पाहा Video

परभणी 33.6 (19.8), अकोला 34.9 (19.0), अमरावती 34. 4 (18.1), बुलडाणा 32.0 (19.6), ब्रम्हपूरी 34.6 (20.1), चंद्रपूर 36.0 (21.2), गडचिरोली 30.0 (18.2), गोंदिया 32.0 (19.0), नागपूर 32.2 (19.0), वर्धा  33.8 (19.0), वाशिम 32.8 (18.0), यवतमाळ 33.2 (20.0) तापमानाची नोंद झाली.

First published:
top videos

    Tags: Mumbai rain, Pune Rain, Rain, Rain fall, Rain updates, Weather Warnings