मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /छ. संभाजीनगरात दुचाकीचा भीषण अपघात; पतीने पत्नीसमोर सोडला जीव; मुलं गंभीर जखमी

छ. संभाजीनगरात दुचाकीचा भीषण अपघात; पतीने पत्नीसमोर सोडला जीव; मुलं गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात

जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, 19 मार्च, अविनाश कानडजे : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव महामार्गावर गोळेगाव धोत्रा फाटा परिसरात हा अपघात घडला. दुचाकी आणि  छोट्या लोडिंग गाडीमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होत की या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दिलीप उदयभान जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर जाधव यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघात   

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव महामार्गावर गोळेगाव धोत्रा फाटा परिसरात दुचाकी आणि छोट्या लोडिंग रिक्षाचा अपघात झाला. या दुचाकीवरून दिलीप जाधव हे आपली पत्नी आणि दोन मुलासह प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये दिलील जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघातग्रस्त कुटुंब बुलडाण्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

ब्लेडने आठवीतील विद्यार्थीनीच्या छातीवर लिहिलं आपलं नाव; मग धमकी देत 10 लाख चोरी करायले लावले अन्,..

 जखमींची प्रकृती चिंताजनक 

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी  छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Accident