मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी, मराठवाड्यातील 62,480 हेक्टर पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी, मराठवाड्यातील 62,480 हेक्टर पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad [Aurangabad], India

  सुशील राऊत,प्रतिनिधी

  छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटमध्ये अवकाळी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील 62 हजार 480 हेक्टरवर असलेल्या वेगवेगळ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना आभाळ फाटल्याप्रमाणे संकट ओढावलंय.

  शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी

  गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे यावर्षी हवामान पर्जन्यमान चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिक पेरणीला प्राधान्य दिलं होतं यावर्षी पाऊस देखील चांगला झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकामध्ये मोठ्या अपेक्षा होत्या यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा ज्वारी गहू या पिकांना प्राधान्य दिले हे रब्बी पिक शेतामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण करून ठेवल्या होत्या.

  गारपीटीनं शेतकऱ्यांची पिकं आडवी, पाहणी करताच पालकमंत्र्यांनी दिले आदेश, Video

  शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या होता तर ज्वारी हरभरा भरले होते त्यासोबतच आंब्याला देखील चांगला मोहर आला होता. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यासोबत गारपीट देखील झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर पेरलेल्या रब्बी पिक पावसामुळे मोठ्या संकटात सापडले आहे .या गारपीटीमध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचे देखील नुकसान झाले आहे.  प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये 42 हजार 644 हेक्टरवर जिरायती तर 2 हजार 869 हेक्टर वरील पिके फळबागांचे नुकसान तसेच 16 हजार 955 हेक्टर वरील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

  सांगली जिल्ह्यातील 'या' भागात चक्क हवेवर पिकवला जातो गहू! पाहा काय आहे प्रकार, Video

  बाजारपेठेवरही परिणाम

  अवकाळी पावसाचा परिणाम आता बाजारपेठेवर देखील बघायला मिळत आहे शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत करून पिकवलेला कांदा आणि भाजीपाला बाजारामध्ये या पिकांना काडी मात्र भाव मिळत आहे तसेच फळबागांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे द्राक्षाचा अर्ध्या किमतीत विकली जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लागलेला खर्च आणि केलेली मेहनतीचा देखील मोबदला मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी हरिभाऊ जाधव यांनी दिली.

  शेतकरी कुटुंबाने मोठ्या कष्टाने शेतातील पीक उभं केलं होतं गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाला आणि या दुखातून सावरत नाही तोच आता अवघडणे शेतकऱ्यांना सपाटला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचला आहे शासनाने या अवकाळी पावसाच्या पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी नामदेव काळे यांनी केली.

  First published:
  top videos

   Tags: Agriculture, Chhatrapati Sambhaji Nagar, Farmer, Local18