मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /छत्रपती संभाजीनगर ते पुणे E-Bus; चालकाला विमानासारखी सुविधा, किती आहे तिकीट?

छत्रपती संभाजीनगर ते पुणे E-Bus; चालकाला विमानासारखी सुविधा, किती आहे तिकीट?

छत्रपती संभाजीनगर ते पुणे आजपासून ई बस सेवा सुरू

छत्रपती संभाजीनगर ते पुणे आजपासून ई बस सेवा सुरू

फक्त 70 टक्के चार्जिंग मध्ये ही बस छत्रपती संभाजी नगर ते पुणे अंतर पूर्ण करते आणि महिलांसाठी सुद्धा या बस मध्ये 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर, 18 मे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या ई बसची सेवा आजपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातली पहिली ई बस आज पुण्याकडे रवाना झाली. गेल्या काही दिवसांपासून ई बस कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले होते. सध्या ही बस छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर सुरू असेल.

बसमध्ये वायफाय, सहा सीसीटीव्ही कॅमेरे, दोन मोठ्या स्क्रीन प्रत्येक आसनाजवळ स्वतंत्र लाईट, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी प्लग अशा सर्व सुविधा या बसमध्ये देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे फक्त 70 टक्के चार्जिंग मध्ये ही बस छत्रपती संभाजी नगर ते पुणे अंतर पूर्ण करते आणि महिलांसाठी सुद्धा या बस मध्ये 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पद अन्यथा काहीच नाही; एका VCवर डीकेंनी एक पाऊल घेतलं मागे 

विमानाप्रमाणे चालकाला सूचना देण्यासाठी बसमध्ये माईकची सुविधा आहे. चालकाच्या सीटसमोर माईक लावण्यात आला आहे. याशिवाय सात सीसीटीव्ही कॅमेरेही सुरक्षेसाठी लावण्यात आले आहेत. प्रवाशांना साहित्य ठेवण्यासाठी जाग आहे. पॅनिक बटणही, फुल लॅम्प, वाचण्यासाठी प्रत्येक सीटला लाईट, एसी, इन कार टीव्ही, प्रत्येक बस थांब्याची माहिती देणारा इलेक्ट्रिक लाइट बोर्ड, चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही ई शिवाई बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झालीय. या बसमुळे प्रवाशांना त्यांचा प्रवास आरामदायी वाटेल. तसंच प्रवासाचा कालावधीही सहा तास इतका आहे. या बसचं तिकिट ५१५ रुपये इतकं आहे. एमएसआरटीसीने म्हटलं की, नव्या ई शिवाई बसच्या दिवसभरात १० पेक्षा जास्त फेऱ्यांसाठी प्रयत्न असतील.

First published:
top videos

    Tags: Pune