अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. हत्या, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीसोबत खुनाच्याही घटना घडत आहेत. औरंगाबादमध्येही गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन त्याचा खुन केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
गंगापूर शहरातील समतानगर येथील गंभीर जखमी लाईनमनचा घाटी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी निफाडमध्ये एकाच्या मुसक्या आवळल्या आहे. तसेच अगोदर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यानंतर आता काल 20 मार्चला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
गंगापूर शहरांमध्ये विद्युत वितरण कंपनीमधील लाईनमन योगेश माणीक भालेकर (45) आणि मित्र नवनाथ खैरे हे 17 मार्च रोजी रात्री आठ वाजता भालेकर यांच्या घरी जेवायला आला होता. त्यावेळी योगेश याने मित्र नवनाथ खैरे याचा मोबाईल हिसकावून घेतला. खैरे यांनी मोबाईल मागितला असता योगेश याने मोबाईल वापस न दिल्याने खैरे याचा राग अनावर झाल्याने त्याने योगेशच्या डोक्यात रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास काठी मारुन गंभीर जखमी करून पळून गेला.
दुसऱ्या दिवशी 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आई घरी आली तेव्हा योगेश गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला ताबडतोब गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जखमी योगेशला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी पाठविण्यात आले. तर याप्रकरणी नवनाथ खैरे याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
यानंतर आरोपी निफाड येथे पळून गेला असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे आरोपीच्या शोध घेण्यासाठी सपोनि अशोक चौरे, पोहेका बलविर बहुरे, पदमकुमार जाधव, यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे शोध घेऊन आरोपीला अटक करून गंगापूर येथे आणले. तर 20 मार्च रोजी पहाटे उपचारादरम्यान योगेश भालेकर यांचे निधन झाले. यामुळे खैरे यांच्या विरोधात आधी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 20 मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले प्रभारी सपोनि शाईनाथ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक चौरे, पोहेका कैलास निंभोरकर, राहुल वडमारे हे करत आहे.
'ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार, ट्रीट द पीपल...', पुण्याच्या रिक्षाचालकाकडून विनयभंग
आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य -
नाशिकमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या गंगापूर रोड धृवनगर परिसरात ही घटना घडली. आईला बेशुद्ध करून चिमुकलीची हत्या केल्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Local18, Murder, Murder news