अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 26 मे : गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यभरातले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. हवामानातील बदलामुळे हाता-तोंडाशी आलेलं पिक गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं यामुळे निराश होत टोकाचं पाऊल उचललं आहे.
संभाजीनगरजवळच्या सुलतानपूर शिवारात राहणाऱ्या किशोर वेताळ या शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन एकर शेतीमध्ये कांद्याचं पिक घेतलं होतं. हे पिक घेण्यासाठी त्याने तब्बल एक लाख रुपये खर्च केले. वेताळ यांनी केलेल्या कष्टामुळे त्यांच्या शेतामध्ये तब्बल 300 क्विंटल कांदा पिकवला.
अवकाळी पावसानंतर त्यांच्या शेतीमधील कांद्याला मोठा फटका बसला. त्यानंतरही त्यांनी मजूर लावून कांद्याची काढणी केली. किमान लागवड केलेले पैसे तरी परत मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण कांद्याला अवघा 3 रुपये किलो भाव मिळत असल्यानं वेताळ चांगलेच निराश झाले होते. मोठ्या कष्टामुळे पिकवलेल्या कांद्यला कवडीमोल भाव मिळत असल्यानं संतापलेल्या वेताळ यांनी टोकाचं पाऊल उचललं.
खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये, हतबल शेतकऱ्याने पिक तसेच सोडून दिले! Video
त्यांनी आपल्या शेतामधील कांद्यावर चक्क जेसीबी फिरवला. 'मी एक लाख रुपये खर्च करून दोन एकर मध्ये कांदा लावला होता. पाऊस पडल्यामुळे माझ्या कांद्याला भाव नाही. तीन रुपये किलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे मला हे कांदा नष्ट करावा लागला आहे, अशी प्रतिक्रिया वेताळ यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Farmer, Local18, Onion