मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऐन लग्नसराईत मोगरा रुसला! विक्रेते झाले हैराण, पाहा काय आहे कारण?

ऐन लग्नसराईत मोगरा रुसला! विक्रेते झाले हैराण, पाहा काय आहे कारण?

X
ऐन

ऐन लग्नसराईत मोगरा रुसला आहे. यामुळे विक्रेते हैराण झाले आहेत.

ऐन लग्नसराईत मोगरा रुसला आहे. यामुळे विक्रेते हैराण झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhatrapati Sambhaji Nagar, India

अपूर्वा तळणीकर

छत्रपती संभाजीनगर, 22 मे : सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरु आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. यातच लग्नसराईची धामधूम आहे. मात्र, या उन्हामध्ये मनाला थंडावा देणारा मोगरा मात्र अजूनही रुसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात लग्न सराईनिमीत्त मोगऱ्यांच्या फुलाची आवक ही अजूनही निम्मीच आहे. आवक जरी निम्मी असली तरी मोगऱ्याच्या फुलाला पाहिजे तसा भाव नसल्याचे चित्र सध्या शहरात पाहिला मिळत आहे. त्यामुळे फुल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

भाव कमी 

छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड महिन्यापासून मोगऱ्याची आवक नियमितपणे सुरू आहे. तरी पण ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍मोगऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याचे पाहिला मिळत आहे. मोगऱ्याचा ठोक भाव 300 ते 400 रुपये किलो आहे तर हा भाव अधून मधून 600 ते 700 रुपये किलोपर्यंत जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पण मोगऱ्याचा हा भाव 900 ते 1000 किलो पर्यंत असायला पाहिजे असे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मोगऱ्याशिवाय इतर फुलांचे भाव बरेच कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. मोगऱ्याच्या गजऱ्यांची 10 ते 20 रुपये नगाने किरकोळ विक्री होत आहे. फुल विक्रेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, असं फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

फुलांचे भाव

मोगरा 300 ते 400 रुपये किलो

झेंडू फुले 40 ते 50 रुपये किलो

निशिगंध 100 रुपये किलो

गुलाब 80 ते 100 किलो

Nagpur News: वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया, पेंचमध्ये फुलपाखरांच्या तब्बल 'इतक्या' प्रजाती, PHOTOS

हारांसाठी लिलीच्या फुलांना मागणी

गेल्या काही दिवसांपासून लिलीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या फुलांची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पांढराशुभ्र लिलीच्या फुलांची हारांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लग्नसराई सुरू असल्यामुळे या फुलांची हारांसाठी मागणी मोठया प्रमाणात आहे. तसेच लिलीच्या फुलांचा गुलाबाच्या हरामध्ये मोठ्या प्रमाणात वापर दिसून येत आहे, असंही फुल विक्रेत्यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Local18