मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /500 पेक्षा जास्त पक्ष्यांचे जीव वाचवणारे डॉक्टर, काम समजल्यावर वाटेल अभिमान, Video

500 पेक्षा जास्त पक्ष्यांचे जीव वाचवणारे डॉक्टर, काम समजल्यावर वाटेल अभिमान, Video

X
दुर्मीळ

दुर्मीळ वारसा जपण्याचं काम हे डॉक्टर करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर गेल्या 10 वर्षांपासून राज्याचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी काम करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhatrapati Sambhaji Nagar [Chhatrapati Sambhaji Nagar], India

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, 22 मे : महाराष्ट्र हा जैवविविधतेनं नटलेलं राज्य आहे, असं आपण नेहमी ऐकतो आणि वाचतो. सह्याद्री पर्वत हे जैवविधतेचं भांडार आहे, राज्यात सह्याद्रीच्या तोलामोलाची जैवविविधता ही अजिंठा डोंगररांगात आढळते. राज्याचा हा वैभवशाली वारसा जपण्याचं काम छत्रपती संभाजीनगरमधील एक डॉक्टर करतायत. त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये 500 पेक्षा जास्त पक्ष्यांचा जीव वाचवलाय.   आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त आपण त्यांच्या कामाची ओळख करुन घेऊया.

संपूर्ण लाईफ एकच मिशन!

सिल्लोडच्या संतोष पाटील यांनी ऱ्हास होत चाललेल्या जैवविविधतेचं संरक्षण करणे हेच आपलं मिशन ठेवलंय. वन्यजीव आणि झाडे यांचं अतूट नातं लक्षात घेऊन त्यांनी गेल्या 3 वर्षांपासून वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतलीय. त्यांनी या माध्यमातून आजवर अनेक दुर्मीळ वनस्पती शोधून काढल्या असून त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

चिंचवनमधील 400 वर्ष वयाचा आणि एक एकर विस्तार असलेला विशाल वटवृक्ष, दिडगावमधील 200 वर्ष जुनं वावळचे झाड, जनासीमधील 200 वर्ष जुना वड, पद्मालय जवळचे 80 फुट उंच आणि 150 वर्ष जुनं बकुळाचं झाड याचं संवर्धन करून त्याची हेरीटेज ट्री म्हणून नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. यपैकी चिंचवनच्या वडाच्या झाडाची नोंद लवकरच वारसा वृक्ष म्हणून होईल, अशी माहिती पाटील यांनी दिलीय.

13 वर्ष झाली, सैन्यात गेलेला मुलगा परतलाच नाही, वृद्ध आई-बाबा बसले उपोषणाला, काय घडलं नेमकं?

डॉ. पाटील यांनी या विषयावर अनेक शोध निबंध लिहिले आहेत. जळगाव जवळच्या मेहरुन तलाव परिसरातील बोरांची प्रजाती ही इतर सर्व बोरांपेक्षा वेगळी असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावावरुन 'झिझीपस बहीनाई' असं नामकरण पाटील यांच्याकडून होणार आहे.  त्याचबरोबर सिल्लोड परिसरात आढळणाऱ्या दुर्मीळ प्राण्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये जैवविविधता नोंद वहीत व्हावी यासाठीही पाटील काम करत आहेत. त्याचा फायदा भावी पिढीला अभ्यासासाठी होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Local18