सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पुस्तकांऐवजी मोबाईल हातात आले यामुळे पुस्तकांचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. वाचकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे ही चिंतेची बाब ठरत असतानाच मराठवाड्यातील अकार्यक्षम असलेले 205 ग्रंथालय बंद करण्याचा निर्णय सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. अकार्यक्षमतेच्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील शासन मान्य असलेल्या 205 ग्रंथालयांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या 205 ग्रंथालयांचा वार्षिक अहवाल अंकेक्षण अहवाल अनेक वर्षांपासून ग्रंथालय संचालनाला प्राप्त झालेला नाही. यामुळे किमान तीन वर्षापासून अहवाल सेवा देत नसलेल्या ग्रंथालयांवरती कारवाई करण्यात आली असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी दिली.
अधुनिक युगात पुस्तकांचे महत्त्व घटले
पुस्तके आणि ग्रंथासारखा दुसरा गुरु नाही असे म्हटले जाते. यामुळे आजही अशा अनेक व्यक्ती आहेत की वाचन केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. मात्र वाचनाची आवड जरी असेल तरी वाचन प्रेमी व्यक्ती सर्वच पुस्तक विकत घेऊन वाचू शकत नाही यासाठी पर्याय उरतो तो ग्रंथालयांचा. यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींच्या जीवनात ग्रंथालयातील पुस्तक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचे युगामध्ये मोबाईल हातात आले आणि पुस्तकांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होताना बघायला मिळते अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील अकार्यक्षम असलेल्या 250 ग्रंथालय बंद करण्याचा निर्णय सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. ग्रंथालयातील अकार्यक्षमता यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शासनमान्य ग्रंथालयांची संख्या आता 4051 एवढी आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्यात आले ‘हे’ सुंदर पक्षी, पाहा का होतीय त्यांची चर्चा!
अधिकारी गाफिल
बारा वर्षापासून राज्यात नवीन ग्रंथालयांना परवानगी ग्रंथालय संचालना तर्फे देण्यात येत नाही. अनेक वेळा मान्यता असलेल्या ग्रंथालयांपैकी अनेक ग्रंथालय सुरू नसल्याचे दिसून येते. या ठिकाणी असलेली अकार्यक्षमता याला कारणीभूत असल्याचे दिसून येते. तीन वर्ष अनेक ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाचा अहवाल पाठवलेला नाही त्यामुळे या ठिकाणची ग्रंथालय सुरू आहेत की बंद याबाबत प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर या ग्रंथालयांवर शासन मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये अशा 205 ग्रंथालयांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक समावेश बीड आणि नांदेड जिल्ह्यामधील ग्रंथालयांचा आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये 38 ग्रंथालयांची मान्यता रद्द झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.