मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /छत्रपती संभाजीनगर हादरलं! प्रेमाची शपथ घातली आणि केला घात, बलात्कार करून पिडितेसोबत भयंकर कृत्य

छत्रपती संभाजीनगर हादरलं! प्रेमाची शपथ घातली आणि केला घात, बलात्कार करून पिडितेसोबत भयंकर कृत्य

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्याकडून पैसे घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्याकडून पैसे घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्याकडून पैसे घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर)19 मार्च : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस बलात्कार, मारामारी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान संभाजीनगरमध्ये आता नवीन एक घटना समोर आली आहे. पतीपासून विभक्त झालेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्याकडून पैसे घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीपासून विभक्त झालेल्या 32 वर्षीय विवाहितेला समवयस्क जुन्या प्रेमीने जाळ्यात ओढत एकत्र राहण्याच्या आणाभाका घातली. यानंतर सतत नऊ वर्ष बलात्कार करत पिडितेकडून व्यवसायासाठी 2 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर पीडित महिलेचा गर्भपात केल्याचेही या तक्रारीत माहिती देण्यात आली आहे.

हिमवादळात अडकलेल्या वृद्धाची जगण्यासाठी धडपड; असा वाचवला स्वतःचा जीव

प्रियकरावर पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भगवान आदमाने असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान महिलेची फसवणूक झाल्याने याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली

छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा शहर हादरलं आहे. सिडको परिसरातील शुभ फायनान्सच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोर शुभ फायनान्सच्या कार्यालयात घुसले, त्यानंतर त्यांनी पैशांची मागणी करत कर्मचाऱ्यावर गोळीबार केला.

मात्र सुदैवानं नेम चुकल्यानं ही गोळी भीतींत घुसल्यानं कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात शुभ फायनान्सचे कार्यालय आहे. 

20 वर्षांपासून एकाच खोलीत बंद होते भाऊ-बहीण; जगत होते नरकासारखं जीवन, कारण जाणून उडेल थरकाप

या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. हल्लेखोरांनी फायनान्सच्या ऑफीसमध्ये घूसून पैसे निकाल म्हणत पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. मात्र नेम चुकल्यानं या हल्ल्यातून कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News