नांदेड, 19 मार्च : भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ या राज्यातील दोन प्रमुख नेत्यांनी शनिवारी नाशिकहून लातूरला येण्यासाठी एकाच विमानातून प्रवास केला. आजही दोघे एकाच विमानातून नांदेडहून मुंबईला गेले. त्यांच्या या एकत्रित प्रवासाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता यावर खुद्द गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं महाजन यांनी?
गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ या राज्यातील दोन प्रमुख नेत्यांनी शनिवारी नाशिकहून लातूरला येण्यासाठी एकाच विमानातून प्रवास केला. आजही दोघे एकाच विमानातून नांदेडहून मुंबईला गेले. त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना आमचा सहप्रवास हा योगायोग होता असं म्हटलं आहे.
पुढे बोलताना महाज म्हणाले की काल मला लातूरला येण्यासाठी विमान नव्हतं. छगन भुजबळ हे नाशिकहून लातूरला जाणार असल्याचं मला समजलं. तेव्हा मी त्यांना फोन करून त्यांच्यासोबत आलो. आज देखील एकच विमान असल्यानं मुंबईला सोबत जात असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
शिंदेंच्या खेडमधील सभेत 'लावरे तो व्हिडीओ'; उद्धव ठाकरेंचे 'ते' सर्व व्हिडीओ दाखवणार!
विरोधकांवर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी विरोधकांना देखील जोरदार टोला लगावला आहे. विरोधकांमध्ये काहींना पंतप्रधान तर काहींना मुख्यमंत्री बनल्याचं स्वप्न पडत आहे. यातून ते रोज एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.