अपूर्वा तळणीकर
छत्रपती संभाजीनगर, 20 मे : भारतामध्ये देश सेवा म्हणजे ईश्वर सेवा मानली जाते. हीच ईश्वर सेवा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील रवींद्र हा सैन्यात भरती झाला. मात्र 2010 पासून तो बेपत्ता आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी आई-वडील वनवन फिरत आहेत. शोध घेताना दोन एकर शेती विकावी लागली. मात्र अद्यापही मुलाचा शोध लागला नाही. यामुळे आता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आम्हाला आमचा मुलगा परत मिळावा एवढीच माफक अपेक्षा प्रशासनाकडे हे आई-वडिल करीत आहेत.
आई-वडिलांच्या संपर्कात होता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या माळेगाव पिंपरी येथील रवींद्र भागवत पाटील हा 2005 साली भारतीय सैन्यांमध्ये भरती झाला. स्वतःचा मुलगा सैन्यात भरती होऊन देशसेवा करीत असल्याच्या आनंदात रवींद्र याचे वडील भागवत आणि बेबाबाई यांचा आनंद गगनात मावत नव्हता. 2005 ते 2010 पर्यंत रवींद्र हा सैन्यात भरती होऊन आई-वडिलांच्या संपर्कात होता मात्र 2010 सालापासून रवींद्र हा अचानक बेपत्ता झाला. त्याचा आई-वडिलांशी संपर्क झाला नाही, असं त्याचे वडील भागवत पाटील सांगतात. याप्रकरणी भागवत यांनी सैन्य कार्यालयामध्ये अनेक वेळा संपर्क साधला मात्र त्या कार्यालयातून पुरेसा प्रतिसाद मिळणार नसल्यामुळे त्यांना तिकडून मुलाच्या बद्दल काहीच उत्तर मिळाले नाही.
अद्यापपर्यंत मुलाचा पत्ता नाही
रवींद्रचे वडील भागवत पाटील यांनी सांगितले की, आमच्या मुलाचा पत्ता लागत नसल्यामुळे आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये माहिती घेतली आम्ही त्या ठिकाणी जाऊनही बघितलं. आमची आर्थिक परिस्थिती आणि वयाने आम्हाला फिरणं शक्य होत नाही तरी देखील मुलाच्या शोधासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो. मात्र अद्याप पर्यंत आमच्या मुलाचा पत्ता लागला नाही या संपूर्ण शोध मोहिमेमध्ये त्यांना दोन एकर शेती गमवावी लागली आहे. यामुळे दुसरा मुलगा आणि त्याची पत्नी सांभाळ करत नाही आमची देखील शेती तुम्ही अशीच गमावून टाकाल असं ते म्हणतात .
Video : संभाजीनगरमध्ये पोलिसांची गुंडगिरी? वाहनचालकाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण
आम्हाला न्याय मिळावा
आम्ही आता सर्व ठिकाणी फिरून बघितलं कार्यालयामध्ये देखील शोध घेऊन बघितलं मात्र आम्हाला उत्तर मिळाले नाही. यामुळे आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून शेवटची दाद मागत आहोत. आम्हाला न्याय मिळावा हीच आमची आपेक्षा आहे. आम्ही त्याला सेवा करण्यासाठीं पाठवलं होत असच नव्हत पाठवलं आम्हाला आमचा मुलगा परत पहिजे आहे, अशी मागणी रवींद्र याची आई बेबाबाई यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.