छत्रपती संभाजीनगर, 23 मे, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातला आहे. या वानराने आतापर्यंत तब्बल 11 जणांना चावा घेतला आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींपैकी काही जणांना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी या शासकीय रुग्णालयता तर काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण पसरं असून, लोक घराच्या बाहेर निघण्यास घाबरत आहेत.
वानराला पकडण्याची मागणी
या वानरानं सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावाच्या परिसरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत त्याने आकरा जणांना चावा घेतला आहे. जखमींवर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वानरानं काही जणांना सोमवारी रात्री आकराच्या सुमारास चावा घेतला आहे, तर काही जणांना आज सकाळी चावा घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था! पाणी टंचाईमुळे बेहाल
या वानरामुळे गावात दहशत पसरली असून, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं या वानराला लवकरात लवकर पकडावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र अद्याप हे वानर पकडण्यात वनविभागाला यश आलेलं नाहीये. वनविभागाकडून या वानराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.