Chhapaak टॅक्स फ्री करण्याची आव्हाडांची भूमिकेवरून Twitter युद्ध; यूजर्सनी विचारलं, Tanhaji का नाही?

Chhapaak टॅक्स फ्री करण्याची आव्हाडांची भूमिकेवरून Twitter युद्ध; यूजर्सनी विचारलं, Tanhaji का नाही?

छपाक Chhapaak ला करमुक्त करण्याची भूमिका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडल्याने Tanhaji च्या समर्थकांनी Twitter युद्ध सुरू केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : छपाक आणि तानाजी हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने स्पर्धा वाढलेली आहे, पण यातल्या छपाक Chhapaak ला करमुक्त करण्याची भूमिका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडल्याने Tanhaji च्या समर्थकांनी Twitter युद्ध सुरू केलं आहे. काँग्रेस प्रशासित तीन राज्यांनी छपाक या दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला अगोदरच करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त होऊ शकतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्याची गोष्ट सांगणाऱ्या तान्हाजीलापण करमुक्त करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

#ChhapaakTaxFree आणि #TanhajiTaxFree असे हॅशटॅग ट्विटरवर दिसू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून छपाकला करमुक्त करण्याची भूमिका मांडली. 'स्त्रियांचे शोषण आणि अत्याचार यामध्ये देशात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. #Chhapaak चित्रपटामध्ये ॲसिड हल्ल्यामधून बचावलेली तरूणी आणि तीचा समाजाशी संघर्ष याचे कथानक करण्यात आले आहे.

या चित्रपटाला करमुक्त (Tax Free) करावे अशी मी सरकारमध्ये भूमिका घेणार आहे.' असं आव्हाड यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर पोस्ट केलं आहे.

तानाजीला टॅक्सफ्री करा. महाराष्ट्राचा इतिहास लोकांपर्यंत पोचायला हवा, अशी भूमिका काही यूजर्सनी मांडली आहे.

तर काही यूजर्सनी चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा या करातून अॅसिड अटॅक झालेल्या मुलींसाठी मदत गोळा करा, असा सल्ला दिला आहे.

-------------------------

अन्य बातम्या

चाहत्याच्या आगाऊपणामुळे सारा अली खान घाबरली , नेमकं काय घडलं पाहा VIDEO

धक्कादायक! गुजरातमध्ये दलित मुलीवर गँग रेप आणि नंतर निर्घृण हत्या

महिलांचा कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल, पेट्रोल पंपावरील ड्रेसिंग रूमधला प्रकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 05:02 PM IST

ताज्या बातम्या