नाशिक, 28 सप्टेंबर : नाशिकमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांना थेट अंडरवर्ल्डकडून धमकी आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुहास कांदे यांनी तसे पत्र पोलिसांकडे दिले आहे. या पत्राची दखल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (NCP senior leader Chhagan Bhujbal) यांनी घेतली असून प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद पेटलेला आहे. या वादानंतर सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड (underworld ) डॉन छोटा राजनच्या (chota rajan) पुतण्याकडून धमकीचा फोन आल्यामुळे नवीन वळण मिळाले.
या प्रकरणी छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
आठव्यांदा प्रेग्नंट 6 मुलांची आई; लोक विचारतात 'एवढ्यांचं पालनपोषण कसं करणार'
आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
तसंच, दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अश्या प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.
काय आहे वाद?
नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे समसमान वाटप न झाल्यामुळे सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली आहे. ही रिट याचिका नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दाखल केली आहे.
Savings अकाउंट चांगलं की Salary अकाउंट? वाचा कोणत्या अकाउंटमुळे होणार फायदा
दरम्यान, 27 तारखेला संध्याकाळी सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन केला होता. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे अन्यथा तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही, अशी धमकी फोनवर दिली, अशी माहिती सुहास कांदे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.