जळगाव, 21 फेब्रुवारी : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनं नांदेडमधून लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुकलं आहे. या सभेत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. नोटबंदीपासून रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, नांदेडमधील आघाडीच्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते. आघाडी झाल्यानंतरची दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त सभा होती. सेना-भाजपची युती झाल्यानं आता आघाडी आणि युती असा थेट सामना रंगणार आहे.