कोरोनाची लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते, शाळा सुरू होणार की नाही, उद्या बैठक

कोरोनाची लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते, शाळा सुरू होणार की नाही, उद्या बैठक

शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. संमतीपत्र द्यायला पालक तयार नाही.

  • Share this:

नाशिक, 21 नोव्हेंबर: कोरोनाची (Coronavirus) लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते, त्यामुळे शाळा School Reopening) सुरू करायच्या की नाही, याबाबत उद्या रविवारी बैठक (Review Meeting) होणार आहे. नाशिकमधील (Nashik) शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा, याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून (23 नोव्हेंबर) सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, स्थानिक प्रशासनानं कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशा सुचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad)  यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा...मुंबईसाठी पुढील 4 आठवडे महत्त्वाचे, लोकल सेवेबाबतही आयुक्तांनी केला मोठा खुलासा

छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा की पुढे ढकलावा, याबाबत रविवारी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. जगातील अनेक देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यात महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. संमतीपत्र द्यायला पालक तयार नाही. कोरोनाची लागण होणार नाही, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे नाशिकमधील शाळांच्या बाबतीत उद्या बैठक घेऊन चर्चा करु. त्यानंतर निर्णय घेणार आहोत.

राज्यात शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत देखील मंत्रिमंडळात मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची कोरोनाची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये, अशी भीती भुजबळांनी यावेळी व्यक्त केली आहे.

जगभरात कोरोनाची जी दुसरी लाट येत आहे, ती पूर्वीपेक्षा भयंकर आहे. लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नका, असं भुजबळांनी सांगितलं.

नाशिकमध्ये कोरोना मृत्यूदर सर्वात कमी आहे. याचं श्रेय व्यासपीठावर बसलेल्या अधिकाऱ्यांना आहे, असं सांगत भुजबळांची कोरोना योद्धांचं कौतुक केलं. मागणीपेक्षा पाचपट जास्त ऑक्सिजन आज नाशिकमध्ये उपलब्ध आहे. आपण परिस्थिती नियंत्रणात आणली. दसरा, दिवाळीला बाजारांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली, नो मास्क नो एन्ट्री सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरलं. लॉकडाऊन काळात पोलीस रस्त्यावर उभे राहिले. यामुळे अनेक पोलिसांना लागण देखील झाली, असंही भुजबळांनी सांगितलं.

हेही वाचा...अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामाभाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटना

राज्यपालांना टोला..

विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी योग्य निर्णय घेतील. ते समजूतदार आहेत, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2020, 1:41 PM IST

ताज्या बातम्या