मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष सुटणार- छगन भुजबळ

वाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला विसरत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे.

मुंबई, 10 जून : वाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला विसरत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 20 वा वर्धापनदिन. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील हल्ला बोल यात्रेचा समारोप पुण्यातील मेळाव्यानं झाला. या मेळाव्याच्या निमित्तानं शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारही या मेळाव्याला उपस्थित आहेत. तसंच या मेळाव्यात सर्वात मोठं आकर्षण असणार होतं ते तब्बल दोन वर्षानं राजकारणात सक्रीय होणारे छगन भुजबळ. भुजबळ या भाषणात नेमकं काय बोलणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती. यावेळी शरद पवारांनी भुजबळांना पगडी घातली आणि हीच पगडी तुम्ही आता डोक्यावर ठेवा, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सदन उभारणीत भ्रष्टाचार केला नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मी जिंदगी का साथ निभाता चला गया असं म्हणत भुजबळ यांनी तुरुंगवासानंतरचं भाषण खुमासदार केलं. सगळ्यांना नोकऱ्या लागल्या चुलीचा धूर नाही,सगळीकडे स्वस्तात गॅस, सगळीकडे बदाबदा पाणी, सगळीकडे सुरक्षा नोटबंदीमुळे दहशतवाद संपला,  भुजबळ यांनी मोदींवर उपरोधिक टीका केली. काय म्हणाले छगन भुजबळ – आगामी काळात जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार – शेतकरी आता आत्महत्या करीत नाही तर उद्योगपती करतोय – सरकारी कर्मचारीसुद्धा सुखी नाही. सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे. – इंदिराजींनी लावलेली आणीबाणी घटनेप्रमाणे होती. आताची आणीबाणी घटनेपलीकडील – मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाला घेऊन मी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. – आरक्षणाच्या मुद्यावरून मी शिवसेना सोडली. मी राष्ट्रवादी का सोडेन ? – अच्छे दिन आले, सांगा कुठला शेतकरी खूश आहे – आरक्षणाला अन्य पक्षांचा विरोध, पण शरद पवारांचेच आरक्षणाला समर्थन – केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी – १०० कोटीचा खर्च असताना ८५० कोटीचा घोटाळा झाला कसा – महाराष्ट्र सदन सुंदर.. छगन भुजबळ अंदर
First published:

Tags: Chhagan bhujbal, NCP, Speech, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील बातम्या