छगन भुजबळ केव्हा येणार जेल बाहेर?

छगन भुजबळ केव्हा येणार जेल बाहेर?

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं छगन भुजबळ आज जेलबाहेर येण्याची शक्यता नसून ते समोवार वर गेलं आहे.

  • Share this:

मुंबई,ता.04 मे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळं दिलासा मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भुजबळ आजच बाहेर येतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं मात्र भुजबळांचं बाहेर येणं सोमवारवर जाण्याची शक्यता आहे.

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी दिर्घकाळ जामीनावर सुनावणी झाली. भुजबळांचे वकील सुजय काटावाला यांनी जोरदार युक्तीवाद करत जामीनाची मागणी केली. भुजबळांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केलं असून यापुढही सहकार्य करतील असं आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिलं. छगन भुजबळ यांची प्रकृती ठिक नसल्याचं कारण त्यांनी दिलं. छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक नाही त्यामुळं त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सर्व युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती देशमुख यांनी त्यांना जामीन अर्ज मंजूर केला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर सुटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. जेल प्रशासनाच्या नियमानुसार सूर्यास्ताआधी प्रक्रिया पूर्ण झाली तरच सुटका होऊ शकते. सूर्यास्तानंतर कुणालाही जेल बाहेर सोडलं जात नाही. शुक्रवारी जामीनाचा निकाल आला नंतर शनिवार आणि रविवार असल्यानं छगन भुजबळ जेल बाहेर यायला सोमवारच उजाडण्याची शक्यता आहे.

 

First published: May 4, 2018, 6:43 PM IST

ताज्या बातम्या