छगन भुजबळांनी फासला सरकारच्या निर्णयाला हरताळ, अखेर पुण्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

हडपसरच्या ससाने नगरमध्ये भुजबळांच्या हस्ते शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

हडपसरच्या ससाने नगरमध्ये भुजबळांच्या हस्ते शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

  • Share this:
पुणे, 15 मार्च :  पुण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत असताना मंञी छगन भुजबळ यांच्याकडूनच शासन निर्णयाला हरताळ फासला गेला आहे. हडपसरच्या ससाने नगरमध्ये भुजबळांच्या हस्ते  शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. न्यूज 18 लोकमतने  भुजबळांच्या कार्यक्रमाची बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली.  यापुढे पुणे परिसरात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात बंदी घातली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाने हे कार्यक्रमाचे आयोजक होते. मात्र, सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केली असताना कार्यक्रमासाठी मुलं गोळा करण्यात आली होती. तरीही भुजबळांनी खासगी शाळेचा कार्यक्रम स्वीकारलाच कसा? असा सवाल उपस्थित केला जातोय तर पुण्यातकोरोनाचे तब्बल 15 रुग्ण आढळून आले आहे. इतकं असूनही उद्घाटनाचा कार्यक्रम माञ एवढ्या गर्दीतही शेवटी पार पडलाच.. तर हा नियोजित कार्यक्रम यापूर्वी दोनदा पुढे ढकलल्याने कोरोनाची साथ असूनही हा कार्यक्रम नाकारू शकलो नाही, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, भुजबळांच्या कार्यक्रमाची बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली.  साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गंत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येवू नये. तसंच यापूर्वी देण्यात आली असल्यास ती परवानगी रद्द करण्याचे आदेश साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना आणि नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 आणि 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शासनाच्या या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असं मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असंही जिल्हाधिकारी राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
First published: