मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Chagan Bhujabal : ‘मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम चुकीचं बोललोचं नाही’, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

Chagan Bhujabal : ‘मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम चुकीचं बोललोचं नाही’, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. यावरून राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. (chagan bhujbal)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. यावरून राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. (chagan bhujbal)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. यावरून राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. (chagan bhujbal)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 29 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. यावरून राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भुजबळ यांनी सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असं वक्तव्य केले होते. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. दरम्यान आता या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचा राजकीयकरण का केला जातो हे मला कळत नाहीये असे म्हणाले. तसेच मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, माझं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार या देशात आहे. मी काय देशाच्या विरोधात बोलले नाही, महात्मा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भाऊराव पाटील हे आपले देव आहेत. या महापुरुषांनी शिक्षणासाठी खूप काम केले आहे, या लोकांनी आपल्याला शिक्षक दिले आहे.

हे ही वाचा : युतीच्या काळात सीएम शिंदे आमच्यासोबत सरकार स्थापन करणार होते अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

सरस्वतीची आपण पूजन करतो ते काय आपल्याला शिकवले नाही त्यांनी कुठे शाळा काढली. सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे मी सरस्वती ऐवजी यांचं पूजा करा अस म्हणालो. मी कुठेही सरस्वती देवीची फोटो काढा असे म्हणलो नाही. मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे ते म्हणाले.

कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. मी सुद्धा हिंदू आहे. नाशिकमध्ये अनेक मंदिरांची कामे मी केली आहेत. कुंभमेळाव्यसाठीही आम्ही भरपूर कामे केली आहेत. माझ्या घरातही देवदेवतांची पूजा होते.

आम्ही सर्वच देवीच्या दर्शनाला जातो. तुम्ही कुटुंबात कोणत्या देवाची पूजा करता हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, शाळेत शाळेत महापुरुषांचे फोटो बाजूला सारून देवीची पूजा करणं योग्य नाही, एवढचं माझं म्हणणं होते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

हे ही वाचा : '...अन् ती एक गोष्ट केली की शरद पवार पुन्हा सत्तेत येतात', सुप्रिया सुळेंचा दावा

काय म्हणाले होते भुजबळ

शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची? असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

First published:

Tags: BJP, Chagan bhujbal, NCP