छगन भुजबळांसह कुटुंबीयांनी मतदानाकडे फिरवली पाठ.. सर्वत्र 'ही' चर्चा सुरू

छगन भुजबळांसह कुटुंबीयांनी मतदानाकडे फिरवली पाठ.. सर्वत्र 'ही' चर्चा सुरू

धक्कादायक म्हणजे छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांती एकाही सदस्याने मतदानचा हक्का बजावला नाही.

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,21 ऑक्टोबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उत्साहात मतदान झाले. अनेक दिग्गजांची भवितव्य मतदान यंत्रात अर्थात EVM मध्ये बंद झाले आहे. राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.05 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे. 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिला आहे, निकालाच्या दिवशी समोर येणार आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार, कोण बाज मारणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

छगन भुजबळांसह कुटुंबीयांनी मतदानाकडे फिरवली पाठ

छगन भुजबळांसह कुटुंबीयांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांती एकाही सदस्याने मतदानचा हक्का बजावला नाही. छगन भुजबळ यांनी स्वतःच्या पराभवाची धास्ती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भुजबळ कुटुंब नाशिक पश्चिम मतदारसंघातील मतदार आहेत. नाशिकच्या ग्रामोदय विद्यालयात त्यांचे मतदान होते. मात्र, मतदारसंघात अडकल्याने मतदानासाठी नाशिकला भुजबळ कुटुंब आलेच नाही. दरम्यान, छगन भुजबळ येवल्यातून तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे नांदगाव-मनमाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मतदानाच्या दिवशी छगन भुजबळ येवल्यात तर समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ नांदगावमध्ये ठाण मांडून होते. एवढेच नाही तर दोन्ही चुलत भावांच्या पत्नी शेफाली आणि विशाखा याही नांदगावात ठाण मांडून होत्या. त्यामुळे त्यांना मतदानासाठी नाशिकला येता आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रात आघाडीचा धुऑं...

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयाची पतका फडकावणार असल्याचे चित्र आहे. महायुती (भाजप-शिवसेना)- 31, भाजप-18, शिवसेना-13, काँग्रेस-5 आणि राष्ट्रवादी-1 जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र एकूण सीट 36

महायुती (भाजप-शिवसेना) - 31

भाजप-18

शिवसेना-13

काँग्रेस-5

राष्ट्रवादी-1

कोण किती लढतंय जागा...

भाजप - 164,

शिवसेना - 124,

काँग्रेस - 147,

राष्ट्रवादी - 121,

सपा - 7,

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 5.

वंचित बहुजन आघाडी - 235,

एम.आय.एम. - 44,

बहुजन विकास आघाडी - 31,

मनस - 105,

बसपा - 262,

आप - 24

2014 निवडणूक

शिवसेना 07

भाजप 15

एनसीपी 05

काँग्रेस 07

अपक्ष 02

2009 निवडणूक

शिवसेना 07

भाजप 05

एनसीपी 09

काँग्रेस 06

सपा 01

अपक्ष 05

एमएनएस 03

एकूण जागा - 288

मुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: October 21, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading