दौंड तालुक्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ? MIDC तील दूषित पाणी ओढ्यात सोडले

दौंड तालुक्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ? MIDC तील दूषित पाणी ओढ्यात सोडले

कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यामधून रसायनयुक्त पाणी ओढ्याला सोडण्यात आलं आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 9 जुलै : दौंड तालुक्यातील मळद आणि परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने मळद हद्दीतील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून ओढ्यातून पाणी वाहत आहे. पण सध्या पाऊस चालू असतानाच कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यामधून रसायनयुक्त पाणी ओढ्याला सोडण्यात आलं आहे. तसंच तेच पाणी तलावामधे जमा झाले असून तलावामधील सर्व पाणी दूषित झाले आहे. हेच रसायनयुक्त पाणी मळद परिसरातील ओढ्यातून वाहत आहे. हे पाणी इतके दूषित आहे की यामुळे परिसरात विविध आजार व रोगराई पसरत आहे.

ओढ्यात कंपन्यांतून सोडलेल्या दूषित पाण्याचा शरीराला स्पर्श जरी झाला तरी त्या भागाला खाज सुटत आहे. अशा या रसायनयुक्त पाण्यामुळे कुरकुंभ आणि मळद परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरे सुद्धा सतत आजारी पडत आहेत. मळद गावामध्ये जलसाठे दूषित झाल्यामुळे जवळ जवळ सर्व गावकऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

हा सर्व जीवघेणा खेळ कुरकुंभ मधील कंपन्यांमुळे सुरू आहे. दर वर्षी पावसाळ्यात असे रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट ओढया, नाल्यामध्ये सोडले जाते. याकडे कोणी लक्ष देत नाही आणि जर कोणी आवाज उठवला तर तो दडपन्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात आहे, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कितीही मोठ्या दुर्घटना झाल्या किंवा लोकांचे नुकसान झाले तरी सर्व काही दुर्लक्षित केले जात आहे. हा जीवघेणा खेळ थांबणार तरी कधी? असं संतप्त सवाल परिसरात नागरिक विचारत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: July 9, 2020, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading