चेंबूर सामूहिक बलात्कार : पीडितेच्या मृत्यूनंतरही 4 नराधम मोकाट, कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी दिला नकार!

चेंबूर सामूहिक बलात्कार : पीडितेच्या मृत्यूनंतरही 4 नराधम मोकाट, कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी दिला नकार!

सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगुहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 30 ऑगस्ट : मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 19 वर्षीय पीडित तरुणीचा बुधवारी मृत्यू झाला. सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगुहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे. पीडितेचा मृत्यू होऊन 45 तासापेक्षा अधिक तास लोटला आहे. मात्र, नातेवाईकांनी अद्याप मृतदेहावर शवविच्छेदन करण्यासाठी होकार दिलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी शवविच्छेदन कक्षाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी नऊ वाजेच्या सुमारास पीडित तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे. तर मुंबईसारख्या शहरामध्ये झालेल्या या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी मुंबईत राष्ट्रवादीचा मोर्चा

राज्यात तरुणींवर बलात्कार होताहेत आणि सरकार यात्रा काढण्यात मग्न आहे अशी टीका शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. मुंबईतल्या चेंबूर भागात आज राष्ट्रवादीनं मोर्चा काढला. चेंबूरमध्ये महिन्याभरापूर्वी बलात्कार झालेल्या पीडित तरुणीचा काल मृत्यू झाला. या प्रकरणी एसआयटी चौकशीसह, आरोपींना फाशीची मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

या प्रकरणी पोलीस महासंचालकांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, ज्या औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडित तरुणीचा मृत्यू झाला. तिच्यावर 3 दिवसानंतरही अंत्यसंस्कार झाले नाहीत. जोवर बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत आज आंबेडकरी पक्ष संघटना आणि पीडितेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन दिलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी 19 वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी आली होती. 7 जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असं सांगत ती घराबाहेर पडली. पण त्यावेळी 4 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या दिवसापासून पीडित तरुणी मरणयातना भोगत होती. बलात्कारामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. तिच्यावर औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर तिचा मृत्यू झाला.

इतर बातम्या - भाजप प्रवेशासाठी नारायण राणे 'वेटिंग लिस्ट'वरच

ज्यावेळी बलात्काराची घटना घडली तेव्हा पीडित तरुणीने घाबरून कोणालाही यासंदर्भात माहिती दिली नाही. पण तिच्या वागण्यातला बदल आणि तिची प्रकृती नाजूक होत चालल्याचं लक्षात घेत तिला 23 जुलैला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली.

पीडितेच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केली असता तिने 4 जणांनी बलात्कार केल्याची माहिती दिली. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी चेंबूरमधील पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला या सगळ्याचा मोठा धक्का बसला होता. ती कोणत्याही वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत नव्हती.

इतर बातम्या - मुंबईची हायटेक सुरक्षा आता ड्रोनच्या हाती, हवेतच होईल शत्रूचा खात्मा!

डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिचा मृत्यू झाला. घरातल्या तरुण मुलीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे तिच्या घरच्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर तिच्या जाण्यावर संपूर्ण गावातून शोक व्यक्त केला जात आहे.

VIDEO : संभाव्य भाजपप्रवेशावर उदयनराजेंची गुगली, म्हणाले...

First published: August 30, 2019, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading