मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बुलडाणा : नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात, काय आहे प्रकरण?

बुलडाणा : नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात, काय आहे प्रकरण?

groom

groom

लग्न आटोपून घरी निघण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाची वरात लग्नाच्या पोशाखातच बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल.

राहुल खंदारे, प्रतिनिधी 

बुलडाणा, 15 डिसेंबर : मी फायनान्स कंपनीत (finance company)आहे... तुमची लोन केस करून देतो... असे सांगत अनेकांना लाखो रुपयांनी फसवणाऱ्या भामट्याला आज, 14 डिसेंबरला फसवणूक झालेल्यांनी अक्षरश: लग्न मंडपातून (wedding)उचलून आणले. लग्न आटोपून घरी निघण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाची ( bridegroom) वरात लग्नाच्या पोशाखातच बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आल्याने पोलीसही काही काळ चक्रावले होते.

मंगेश भगवान सोळंके (रा. पुनई, ता. मोताळा) असे या संशयिताचे नाव आहे. मार्चमध्ये एक 25 वर्षांचा तरुण बुलडाणा शहरातील चांडक ले आऊट भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता. मी उषा फायनान्समध्ये आहे. सध्या वर्क फॉर्म होम सुरू आहे, असे म्हणत त्याने काही नागरिकांना २ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी लोकांकडून प्रोसेसिंग फी म्हणून त्याने 40 हजार, काहींकडून 12 हजार रुपये असे लाखो रुपये गोळा केले.

Jharkhand: गावाचे नाव इतके विचित्र होते, गावकऱ्यांना वाटत होती लाज

ऑगस्टमध्ये एके दिवशी सकाळीच तो खोली सोडून फरारी झाला. त्यानंतर ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचे फोन उचलणेही त्याने बंद केले. त्यामुळे हादरून गेलेल्या नागरिकांनी त्याच्या नातेवाइकांच्या माध्यमातून शोध घेतला असता तो वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहतो व लोकांची फसवणूक करतो, असे लोकांच्या लक्षात आले. मोताळा आणि खामगाव तालुक्यातील आवार येथेही त्याने अनेकांना फसवले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागपूर: संपत्ती हडपून लेकांनी सोडलं वाऱ्यावर, कॅन्सरग्रस्त आईच्या नशिबी वनवास

आज, १४ डिसेंबर रोजी शेगाव तालुक्यातील तरोडा येथे त्याचे लग्न लागणार असल्याची कुणकुण फसवणूक झालेल्यांना लागली. लग्न आटोपून तो शेगावात पोहोचला असता मध्येच लोकांनी नवरदेवाची गाडी अडवली. नवरदेवाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्‍याला नवरीच्या ताब्यातून घेत बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

First published:

Tags: Bridegroom, Crime