बॉक्स ऑफिसवर 'तानाजी'चा धुमाकूळ, आता उदयनराजेंना अजय देवगणकडून 'ही' अपेक्षा

बॉक्स ऑफिसवर 'तानाजी'चा धुमाकूळ, आता उदयनराजेंना अजय देवगणकडून 'ही' अपेक्षा

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा सिनेमा महाराष्ट्रातही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'तानाजी' (tanaji the unsung warrior) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दोन दिवसांत या सिनेमाने बक्कळ कमाई केल्याचंही पाहायला मिळालं. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा सिनेमा महाराष्ट्रातही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

अजय देवगण याच्या तानाजी चित्रपटासह दीपिका पदुकोनचा (Deepika Padukone) छपाक हा सिनेमाही 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला होता. त्यातच अजय देवगणचा तानाजी (Tanhaji: The Unsung Warrior) आणि छपाक (Chhapaak) एकाच दिवशी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर मात्र दोन्ही सिनेमांमध्ये अटीतटीची स्पर्धा असल्याचे दिसत आहे. छपाकनं पहिल्या दिवशी 8 कोटींची कमाई केली. तर तानाजी सिनेमानं पहिल्याच दिवशी 18 कोटींची कमाई केली.

महाराष्ट्रातून तानाजी सिनेमावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी आणि छपाक हे दोन्ही सिनेमे महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे, उदयनराजे भोसले यांनी या सिनेमाची तोंड भरून स्तुती केली आहे. तसंच भविष्याबाबत अजय देवगणकडून अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

'तानाजी द अनसंग वॉरीयर या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा,' असं ट्वीट उदयनराजे यांनी केलं आहे.

'तानाजी' Vs 'छपाक', बॉक्स ऑफिसवर स्पर्धा

दीपिका पादुकोणच्या 'छपाक' चे बजेट सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 'छपाक' ची कथा मालती म्हणजेच अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या हिच्या जीवनावर आधारित आहे. तर, तानाजी हा सिनेमा अजय देवगणचा 100वा सिनेमा असून तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.

अजय देवगण यांच्या 'तन्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने उत्तर भारतात पहिल्या दिवशी शानदार ओपनिंग केली. तर दक्षिण भारतातील रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा दबदबा दिसला. दीपिकाच्या 'छपाक'लाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2020 11:39 AM IST

ताज्या बातम्या