सातारा, 14 जानेवारी : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला.
उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद
-शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल असं कुणी नाही
कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध
जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज
शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष
लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?
पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं
महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? उदयनराजेंची शिवसेनेवर टीका
शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का?
शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही
महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग कला नाही
आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान
तुलना केल्याने वाद चिघळला, भाजप बॅकफूटवर
भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
भाजपच्या आयटी सेलचे संजय मयूख यांनीदेखील ट्विटरवरून पुस्तकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मयूख यांचा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात मयूख यांनी म्हटलं आहे की, 'गोयल यांनी हे त्यांचे वैयक्तिक लेखन असून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते मागे घेतो असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाशनही भाजपचे नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.