क्रिकेटच्या मैदानात 'राजें'ची बॅटिंग, MCAच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पदी निवड

क्रिकेटच्या मैदानात 'राजें'ची बॅटिंग,  MCAच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पदी निवड

खासदार संभाजीराजे यांनी क्रिकेटच्या मैदानात एण्ट्री करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी क्रिकेटच्या मैदानात एण्ट्री करत सर्वांनाच धक्का दिला आहे. संभाजी राजे यांची थेट मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बोर्ड ऑफ डायरेक्टरपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान अद्याप मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक 4 ऑक्टोबरला होणार आहे. याआधीच छत्रपती संभाजीराजे यांची संचालक मंडळाच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळं राजकारणात उतरलेल्या छत्रपतींनी आता क्रिकेटमध्येही प्रवेश केला आहे.

दरम्यान मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक 4 ऑक्टोबरला अटळ करण्यात आली आहे. यात सत्ताधारी बाळ म्हाडदळकर गटाला युनायटेड फॉर चेंज या गटाचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. असे असले तरी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी डॉ. विजय पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अमोल काळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे चित्र दिसत आहे.

दरम्यान अध्यक्ष-उपाध्यक्ष वगळता याचदिवशी कार्यकारिणीच्या 14 जागांसाठी 38 उमेदवारांनी अर्ज केला आहे. यात राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळं त्यांच्या गटातील पाटील आणि काळे यांची बिनविरोधत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी अनुक्रमे निवड निश्चित झाली आहे.

कोण आहेत छत्रपती संभाजीराजे

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया वाढविण्याच्या उद्देशानेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.

VIDEO : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, उमेदवारीसाठी थेट रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या