महत्त्वाची बातमी! पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

महत्त्वाची बातमी! पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या 16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

  • Share this:

सातारा, 15 फेब्रुवारी :  साताऱ्यावरून पुण्याकडे जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करणार असेल तर या महामार्गात थोडे बदल करण्यात आले आहे.

खेडशिवापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या 16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये याकरीता कोल्हापूर बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिनियम कल 33 (1) (ब) नुसार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत.

सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.

दरम्यान, खेड शिवापूर टोलनाका हटाव या करता शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, आंदोलनाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे वाहन अडवले जाणार नाही. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. असे टोल हटाव कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्याहुन पुण्याकडे जाणारी वाहतुकीत असे बदल करण्यात आले आहे.

१)सातारा वाढेफाटा- वाठार स्टेशन-लोणंद मार्गे निरा, जेजुरी मार्गे पुणे

२)शिरवळ- लोणंद मार्गे- निरा, जेजुरी मार्गे पुणे

३)वाई- शहाबाग फाटा-ओझर्डे- जोशीविहिर मार्गे-वाठार स्टेशन मार्गे पुणे

अवजड वाहने वाढे फाटा मार्गे- वाठार स्टेशन- लोणंद मार्गे पुण्याकडे जातील

First published: February 15, 2020, 11:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या