मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भीषण अपघातात ट्रॅक्टरचा चक्काचूर; एकाच कुटुंबातील 4 जण ठार, 6 गंभीर

भीषण अपघातात ट्रॅक्टरचा चक्काचूर; एकाच कुटुंबातील 4 जण ठार, 6 गंभीर

जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चांदवड, 6 जून : चांदवड-देवळा मार्गावरील भावड घाटात आज दुपारी अज्ञात वाहनाने ट्रॅकटरला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नव्याने घेतलेल्या जमिनीकडे अख्खं कुटुंब ट्रॅक्टरने जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. चांदवड तालुक्यातील पुरी येथील मधुकर शंकर भवर यांनी देवळाजवळ शेती घेतली आहे. या शेतीला पाहण्यासाठी भवर कुटुंबातील 9 जण एका ट्रॅक्टरवर जात असताना भावडी घाटाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. हेही वाचा - जनतेमध्ये घबराट! कोरोनाची लक्षणं नसल्यास 24 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचा पुढचा भाग चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टरवरील 9 पैकी 3 जणांचा जागीच तर एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्यात भवर यांचा मुलगा विजय, सुन सुनिता,नातू सोन्या आणि त्यांचे व्याही भाऊसाहेब काळे यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यावर देवळा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published:

पुढील बातम्या