लढत विधानसभेची : चांदवड - देवळा मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांच्यासमोर आव्हान

लढत विधानसभेची : चांदवड - देवळा मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांच्यासमोर आव्हान

2014 साली या मतदारसंघात माजी मंत्री दौलतराव आहेर यांचा मुलगा डॉ. राहुल आहेर यांची एन्ट्री झाली. चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर विजयी झाले आणि शिरीष कोतवाल यांचा पराभव झाला. या विधानसभा निवडणुकीत भालेराव-कोतवाल हे जवळ आलेले असून, आमदार डॉ. राहुल यांच्यापुढे ते सक्षम पर्याय देतील, अशी चर्चा आहे.

  • Share this:

नाशिक, 18 सप्टेंबर : चांदवड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1985 ते 1999 पर्यंत भाजपचे दिवंगत नेते जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1999 सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिरीष कोतवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

मूळचे काँग्रेसचे असलेले शिरीष कोतवाल यांनी 1999 साली राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि भाजपकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणला.

चांदवड मतदारसंघात देवळा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. 1995 मध्ये माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी स्वतंत्र देवळा तालुक्याची निर्मिती केली होती. त्यानंतर तो चांदवड-देवळा मतदारसंघ या नावाने ओळखला जाऊ लागला.

2004 साली शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तमबाबा भालेराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत चांदवड-देवळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत बऱ्याच घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उत्तमबाबा भालेराव यांना उमेदवारी मिळाली तर शिरीष कोतवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ : भाजपला काँग्रेसचं आव्हान

2014 साली या मतदारसंघात माजी मंत्री दौलतराव आहेर यांचा मुलगा डॉ. राहुल आहेर यांची एन्ट्री झाली. चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर विजयी झाले आणि शिरीष कोतवाल यांचा पराभव झाला.

चांदवड - देवळा मतदारसंघात निवडणुकांमध्ये पाणीप्रश्नाचा मुद्दा होता. या विधानसभा निवडणुकीत भालेराव-कोतवाल हे जवळ आलेले असून, आमदार डॉ. राहुल यांच्यापुढे ते सक्षम पर्याय देतील, अशी चर्चा आहे.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

डॉ. राहुल आहेर (भाजप) - 54,944

शिरीष कोतवाल (काँग्रेस) - 43,785

डॉ.आत्माराम कुंभार्डे (अपक्ष) - 29,409

======================================================================================

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 06:22 PM IST

ताज्या बातम्या