Home /News /maharashtra /

महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस सरकारच्या निशाण्यावर; 'अडीच वर्षातील कामांची चौकशी होणार'

महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस सरकारच्या निशाण्यावर; 'अडीच वर्षातील कामांची चौकशी होणार'

सोमवारी कोर्टाच्या निर्णयानंतर हे सरकार कोसळू शकतं, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावर बावनकुळे म्हणाले, की काही लोकं दिवसा स्वप्न बघतायेत

    मुंबई 06 ऑगस्ट : चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षात केलेल्या कामांची चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'अडीच वर्षात त्यांनी काय केलं याची चौकशी होणार आहे. यात अडीच वर्षात केलेले घोटाळे तपासले जातील. घोटाळे समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल', असं बावनकुळे म्हणाले आहेत. 'उद्धव ठाकरेंसोबत असताना शिंदे शिस्तीत वागायचे, पण आता..', अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला दरम्यान बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. सोमवारी कोर्टाच्या निर्णयानंतर हे सरकार कोसळू शकतं, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावर बावनकुळे म्हणाले, की काही लोकं दिवसा स्वप्न बघतायेत. त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. शिंदे - फडणवीस सरकार मजबूत आहे. या सरकारने 36 दिवसात 42 निर्णय घेतले आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली. अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांचे दौरे तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरुनही नव्या सरकारवर टीका केली होती. यालाही बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, की मोदींजीच्या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. राज्याला ओबीसी आरक्षण अणि निधी जास्त मिळावा याकरता हे दौरे आहेत. त्यासाठी त्यांना वारंवार दौरे करावे लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'भाजपसोबत गेले म्हणून वाचले'; वर्षा राऊतांच्या ईडी चौकशीदरम्यान सुनील राऊतांचा शिवसेना नेत्यांवरच गंभीर आरोप मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले, की न्यायालय कुठेच बोललं नाही की मंत्रिमंडळ विस्तार करू नका. मविआने अडीच वर्षे लोकांशी बेईमानी केली आहे. हवं कर अजित पवारही त्यांच्यासोबत दिल्लीला जावू शकतात, असा सल्लाही त्यांनी दिला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ajit pawar

    पुढील बातम्या