अमरावती 30 सप्टेंबर : भाजपासोबत युती तोडून उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. मात्र, उद्धव ठाकरेंनी केलेल्या गद्दारीचा बदला एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे, अशी सणसणीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. अमरावती येथे पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा सत्यानाश केला आहे. तर शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि संस्कार कायम ठेवण्यासाठी भाजपासोबत पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मागील फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेतर्फे आलेल्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता असं विधान अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर बरीच राजकीय चर्चा रंगली. अशात कोंडीत सापडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मदतीला चंद्रशेखर बावनकुळे धावून आले. उद्धव ठाकरेच त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख असल्याने एकनाथ शिंदे यांचा त्यात काही दोष नाही असा निर्वाळा बावनकुळे यांनी दिला आहे.
'एक नेता, एक झेंडा, एक मैदान...'; शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली. ते म्हणाले की 'अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत भाष्य केलं पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. यामुळे राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसनेची सूत्रे नव्हती', असंही बावनकुळे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde