Home /News /maharashtra /

भेट झालीच नाही! भावाचं शेवटचं दर्शन घ्यायला बहीण पायी निघाली पण...

भेट झालीच नाही! भावाचं शेवटचं दर्शन घ्यायला बहीण पायी निघाली पण...

लॉकडाउनच्या काळात भावाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर बहिणीला त्याचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही.

    चंद्रपूर, 30 मार्च : कोरोनाला रोखण्यासाठी भारतात 25 मार्च ते 14 एप्रिल या काळात लॉकडाउन करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. या लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखणं शक्य होणार आहे. याच लॉकडाउनच्या काळात एका बहिणीला तिच्या भावाचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. भावाच्या मृत्यूची बातमी समजली पण लॉकडाउनमुळे तिला जाण्यासाठी वाहन नव्हते. तेव्हा चालत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पोलिसांनी तिला अडवलं. पोलिसांना त्यांच्या कर्त्यव्यापुढे काहीच कऱणं शक्य नव्हतं. अखेर 20 किमी अंतरावर असूनही बहिण भावाची अखेरची भेट राहून गेली. गोंडपिंपरी तालुक्यातल्या गोजोली इथल्या प्रकाश उराडे यांचा शनिवारी मृत्यू झाला. तेव्हा कोरोनामुळे लॉकडाउनच्या परिस्थितीत कुटुंबियासमोर अडचण होती ती नातेवाईकांना कळवण्याची. कारण मृत्यूची बातमी दिली तरी येण्याची शक्यता नाही. सख्ख्या भावाच्या मृत्यूची बातमी बहिणीला सांगावीच लागली. ती यायला निघाली पण येण्यासाठी काहीच मार्ग नव्हता. गाड्या नसल्यानं तिनं चालत निघायचा निर्णय घेतला पण काही अंतरावर तिला पोलिसांनी अडवलं. भावाचा मृत्यू झालाय त्याच्या अंत्यसंस्काराला जायचं आहे असं सांगितलं पण पोलिसांनी तिला परवानगी दिली नाही. तेव्हा मला जाऊ द्या असंही विनवलं, जवळपास दोन तास तिने पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केल्या. एका बहिणीच्या वेदना त्यांना समजत होत्या पण कर्तव्यही बजावायचं होतं. शेवटी तिला जाता आलंच नाही. बहिण तिच्या भावाच्या अंतिम दर्शनासाठी येणार म्हणून तिकडे कुटुंब वाट बघत होतं. पण बहिण येण्याची चिन्हे दिसेनात. ती येणार नाही असं समजल्यानंतर प्रकाश उराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वाचा : धोका वाढला! Coronavirus च्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सरकारने दिली नवी माहिती चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. यामुळं अनेक देशांमध्ये लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. भारतातही लॉकडाउन केल्यानंतर शहरांमध्ये मोलमजुरी करणाऱ्या कामगारांनी गावकडे पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक राज्यांमधून हजारो लोक पायी गावाकडे जात असल्याचं चित्र दिसत आहे. हे वाचा : अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी पायपीट
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या