Elec-widget

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ : भाजपला काँग्रेसचं आव्हान

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ : भाजपला काँग्रेसचं आव्हान

चंद्रपूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली मोहर उमटवली आहे. त्यामुळेच भाजपसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 18 सप्टेंबर : चंद्रपूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली मोहर उमटवली आहे. त्यामुळेच भाजपसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे.

1995 पर्यंत चंद्रपूर म्हणजे काँग्रेस असं समीकरण होतं. पण 1995 मध्ये हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला आणि सुधीर मुनगंटीवार आमदार झाले. त्यानंतर आतापर्यंत तब्बल 3 वेळा सुधीर मुनगंटीवार आणि मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर 2 वेळा नाना शामकुळे आमदार झाले. मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला या विधानसभा मतदारसंघात २५ हजारांची आघाडी मिळाली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर खासदार म्हणून निवडून आले आणि हंसराज अहिर यांचा पराभव झाला. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

चंद्रपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक विरुद्ध परका उमेदवार हा मुद्दा गाजला होता.आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार आहे. चंद्रपूरचे विद्ममान आमदार नाना शामकुळे हे स्थानिक नसल्यामुळे चंद्रपूरला वेळ देत नाहीत, असा विरोधकांचा त्यांच्यावर आरोप आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे किशोर जोरगेवार यांनी पक्ष सोडला आणि विधानसभेसाठी स्थानिकच आमदार हवा, हा मुद्दा घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नाना शामकुळे यांना तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी मिळू नये असं वाटतं. यामुळे किशोर जोरगेवार यांना भाजपमधूनच मदत होण्याची दाट शक्यता आहे.

Loading...

लढत विधानसभेची : नागपूर पूर्व मध्ये यंदा कोण बाजी मारणार?

वंचित बहुजन आघाडीकडे लक्ष

मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असल्याने काँग्रेसमधून निवडणूक लढवायला अनेक जण इच्छुक आहेत. पण निवडून येण्याच्या क्षमतेमुळे किशोर जोरगेवार यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते.

विद्यमान आमदार नाना शामकुळे हे निष्क्रिय असल्याचा विरोधकांचा ठपका असला तरी गेल्या १० वर्षांत त्यांच्यावर कुठलाच भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यातही त्यांना यश मिळालं आहे.

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात नवबौध्द मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हे मतदार प्रकाश आंबेडकरांबाबत सहानुभूती ठेवून असले तरी त्यांच्या पक्षाला मतदान करतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. पण हे मतदार वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहिले तर इथला निकाल फिरू शकतो.

=======================================================================================

VIDEO 'आरे' वाचवण्यासाठी काँग्रेसचे माजी पर्यावरणमंत्री शिवसेनेच्या साथीला, काय म्हणाले ऐका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...