Home /News /maharashtra /

PUBG गेममध्ये टास्क पूर्ण करू शकला नाही, 19 वर्षीय युवकाने थेट टोकाचं पाऊल उचललं!

PUBG गेममध्ये टास्क पूर्ण करू शकला नाही, 19 वर्षीय युवकाने थेट टोकाचं पाऊल उचललं!

भद्रावती तालुक्यातील माजरी शहरात ही धक्कादायक घटना घडली असून गौरव पाटेकर असं मृतक युवकाचे नाव आहे.

हैदर शेख, चंद्रपूर, 21 ऑगस्ट : मोबाईलमध्ये एखादी गेम एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे, असं सांगितलं तर कुणाला चटकन विश्वास बसणार नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पब्जीमुळे एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. पब्जी खेळात टास्क पूर्ण करू न शकल्याच्या नैराश्यातून 19 वर्षीय युवकाने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं जीवन संपवलं. भद्रावती तालुक्यातील माजरी शहरात ही धक्कादायक घटना घडली असून गौरव पाटेकर असं मृतक युवकाचे नाव आहे. आत्महत्येआधी मित्राला फोन केला आणि.... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणावरही झाला. काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेस घेतले गेले, तर काही भागात मुलं शिक्षणापासून दूरच राहिली. लॉकडाऊनच्या रुपाने शाळेपासून मोठी सुट्टी मिळाल्याने मुलं घरी विविध गेम खेळत आपला वेळ घालवू लागली. भद्रावती तालुक्यातील गौरव पाटेकरलाही लॉकडाऊन काळात पब्जी या गेमचे व्यसन जडले. मित्रांसोबत पब्जी गेम खेळताना दिवस कसा निघून जात असे, हे देखील गौरवला कळत नसे. मात्र हीच आवडती गेम गौरवच्या मृत्यूचं कारण ठरली. कारण एक टास्क पूर्ण होत नसल्यामुळे गौरवला भयंकर नैराश्य आलं. त्याने मित्राला फोन करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि गळफास लावून जीवन संपवलं. दरम्यान, याप्रकरणी माजरी पोलीस पुढील तपास करत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या