मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विकृत शिक्षक गजाआड, विद्यार्थिनीला नोटबुकमध्ये लिहून द्यायचा अश्लिल शब्द

विकृत शिक्षक गजाआड, विद्यार्थिनीला नोटबुकमध्ये लिहून द्यायचा अश्लिल शब्द


चंद्रपूर जिल्हयात नागभीड तालुक्यात मेंढा चारगाव इथं येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

चंद्रपूर जिल्हयात नागभीड तालुक्यात मेंढा चारगाव इथं येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

चंद्रपूर जिल्हयात नागभीड तालुक्यात मेंढा चारगाव इथं येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

    चंद्रपूर, 14 एप्रिल : तिसऱ्या वर्गात विद्यार्थिनीच्या नोटबुकमध्ये अश्लिल शब्द लिहुन वाचायला लावणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दिवाकर डोंगरवार असं या निर्लज्ज शिक्षकाचं नाव आहे.

    चंद्रपूर जिल्हयात नागभीड तालुक्यात मेंढा चारगाव इथं येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडलाय. शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या नोटबुकवर एक महिन्यापासून शाळेचा मुख्यापक असलेला तिचा वर्गशिक्षक दिवाकर डोंगरवार विद्यार्थिनीच्या नोटबुकमध्ये अश्लिल वाक्य लिहुन वाचायला तसंच लिहायला सांगायचा.

    नंतर ते शब्द खोड रबरने खोडायलाही लावायचा या संदर्भात पीडित मुलीने आईला प्रकार सांगितल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला. या शिक्षकाविरुद्ध तळोधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्या मुख्याध्यापकाला भादवि 354  तसंच पास्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आलीये.

    First published:
    top videos