Home /News /maharashtra /

11 प्रवासी असणारी सुमो गाडी पलटली, 4 गंभीर जखमी

11 प्रवासी असणारी सुमो गाडी पलटली, 4 गंभीर जखमी

अपघातात जखमी झालेल्या 11 प्रवाशांपैकी 4 जण गंभीर असल्याची माहिती आहे.

    हैदर शेख, चंद्रपूर, 13 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणारी सुमो उलटून 11 प्रवासी जखमी झाले आहेत.  चिमूर तालुक्यातील खैरीजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या 11 प्रवाशांपैकी  4 जण गंभीर असल्याची माहिती आहे. नागपूरला जोडणाऱ्या कांपा येथे हे वाहन जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. शंकरपूर येथील टाटा सुमो वाहन चालक राजीक शेख देखील यात गंभीर झाला आहे. सर्व जखमींना शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील काही जखमींना चिमूर, चंद्रपूर आणि नागपूरला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, शंकरपूर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. सर्व जखमी याच परिसरातील रहिवासी असून नागरिकांनी शंकरपूर आरोग्य केंद्रात एकच गर्दी केली आहे. पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा, पुणे-बंगळुरू या महामार्गांवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: चंद्रपूर chandrapur

    पुढील बातम्या