Home /News /maharashtra /

चंद्रपूर हादरलं! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला महिलेचा जळालेला पाय, धड गायब

चंद्रपूर हादरलं! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला महिलेचा जळालेला पाय, धड गायब

चंद्रपूर शहरातील तुकुम भागातल्या विधी महाविद्यालय परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला पाय आढळून आला आहे.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 09 मार्च : चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील विधी महाविद्यालय परिसरालगत एका पॉलिथिनमध्ये गुंडाळून फेकलेला पाय आढळल्याची धक्कादायक घटना घडली आई. हा  महिलेचा  जळालेला पाय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस टीम-श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमागचे सत्य शोधले जात आहे. चंद्रपूर शहरातील तुकुम भागातल्या विधी महाविद्यालय परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला पाय आढळून आला आहे. प्राथमिक तपासामध्ये हा एका महिलेचा पाय असल्याचं स्पष्ट झालं असून एका पॉलिथिन मध्ये गुंडाळून असलेला हा पाय अर्धवट जळालेल्या स्थितीत स्थानिक युवकाला आढळून आला. याची माहिती तातडीने रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आपल्या पथकासह श्वान पथकालाही पाचारण करत या स्थळाचा पंचनामा सुरू केला. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या चमूने घटनास्थळावरून सर्जिकल कामात वापरले जाणारे काही हातमोजे- कात्री आदी साहित्य देखील जप्त केलं आहे. मात्र, हे सर्व साहित्य इथं कसं आलं? हा एखादा बनाव तर नाही ना? याचे उत्तर देखील पोलिसांना द्यावे लागणार आहे. चंद्रपूर शहराच्या या मागात तुकूम परिसरातल्या मांस विक्रीची दुकाने आहेत. घटनास्थळाजवळ कोंबडी आणि बकरे यांच्या कापलेल्या तुकड्यांचे अवशेष देखील मोठ्या प्रमाणावर आढळून आले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.  श्वानपथकाला पाचारण केल्यावरही या घटनेचे गूढ उकलण्यात फारसे यश मिळाले नाही. शहरातील याच भागात मांसविक्रीची दुकाने देखील आहेत. त्यामुळे कोंबडी-बकरा यांच्या कापलेल्या तुकड्यांसह दुर्गंधी पसरली आहे. अगदी थेट समोरच विधी महाविद्यालय असल्यानं हा पाय इथे कसा पोहोचला? शरीराचे अन्य भाग कुठे आहेत? याबाबत तपास केला जात आहे. दरम्यान, शहर-जिल्ह्यातील बेपत्ता मुली-महिला तक्रारींचा माग काढला जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Chandrapur, Chandrapur news

    पुढील बातम्या