हैदर शेख, चंद्रपूर, 8 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कसर्ला येथे दोन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीला शेतशिवारात एकटीच पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुलीची आई 7 आॕगस्टला अन्य एका शेतावर मजुरीला गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी दुपारच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतावर पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे निघाली असता मंगेश दिवाकर मगरे- 27 व अजय मुर्लीधर ननावरे -20 यांनी पाठलाग केला. शेतात गेल्यावर तिच्यावर दोघांनी बळजबरीने अत्याचार केला.
हे कृत्य सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने स्वतःच्या शेतात एका कागदावर घडलेला सर्व प्रकार चिठ्ठीत लिहून ठेवत शेतालगतच्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई घरी आल्यावर मुलगी घरी व गावात कुठेही दिसत नाही म्हणून रात्री शेतावर शोध घेतला. तेव्हा एका ठिकाणी पावड्याखाली लिहिलेली चिठ्ठी मिळाली. बरेवाईट केल्याचा संशय आल्याने जवळच्या विहिरीत शोध घेतल्यावर पीडित मुलीचा मृतदेह हाती लागला.
'माझ्या मृत्यूचं कारण...' असं म्हणत पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्या दोन तरुणांचे नावे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली होती.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर चिठ्ठीत नमूद दोन युवकांविरूद्ध नागभीड पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. पीडितेचे शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur