हैदर शेख, प्रतिनिधीचंद्रपूर, 20 मे : चंद्रपूर शहरालगत (Chandrapur City) मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ भीषण अपघात (major accident) झाला आहे. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक (Petrol Tank and Truck collide) झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली आहे. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. या अपघाताची माहिती मिळताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली. मूल-रामनगर पोलिसांची पथके, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालं.
या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दोनपैकी एका ट्रकमध्ये लाकूड असल्याची माहिती असून या आगीत चालक-वाहकांचे काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.
वाचा : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता
अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने आग आणखी भडकली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत सहा जण होरपळले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, पोलीस तपास सुरू आहे. तसेच मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, 6-7 लोक ढिगाऱ्याखाली अडकले
रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन चार-लेन बोगद्याचा एक भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्यात नऊ लोक अडकले, त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, खूनी नाल्यातील बोगद्याच्या पुढील बाजूचा एक छोटासा भाग ऑडिट दरम्यान कोसळल्यानंतर, पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केलं.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांची सुटका करण्यात आली असून सात जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेले लोक बोगद्याचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.