Home /News /maharashtra /

रुग्णालयाबाहेर 9 तास फुटपाथवर झोपून होता कोरोनाबाधित, अखेर रात्री मिळाला बेड!

रुग्णालयाबाहेर 9 तास फुटपाथवर झोपून होता कोरोनाबाधित, अखेर रात्री मिळाला बेड!

सकाळी 11 वाजेपासून रमेश स्वान हे शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर फूटपाथवर पडून होते. अखेर प्रशासनाने रात्री

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 11 एप्रिल : राज्यात कोरोनाची (maharashtra corona cases) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरातील हॉस्पिटलमध्ये लवकर बेड उपलब्ध होत नाही. तर ग्रामीण भागात परिस्थिती आणखी भयावह आहे. चंद्रपूरमध्ये (Chandrapur) रुग्णालयाच्या बाहेर झाडाखाली तडफडत असलेल्या एका वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अखेर, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल 9 तासांनंतर या वृद्धाला रुग्णालयात बेड मिळाला. चंद्रपूर शहरातील शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर बाधीत वृद्धाची प्रचंड परवड बघायला मिळाली आहे. सकाळपासून मूल मार्गावरील वन अकादमी परिसरात एका झाडाखाली तळमळत असलेल्या वृद्धाचा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. रमेश स्वान असं कोरोनाबाधित वृद्धाचे नाव आहे. या वृद्धाचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. यात रमेश स्वान यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी घरून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बेड नसल्याने वन अकादमी परिसरात आणले. मात्र, त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला गेला. हा रुग्ण बेवारस असल्यासारखा एका पदपथावर उपचाराविना तळमळत होता. या रुग्णाला तातडीने बेड आणि ऑक्सिजनची गरज आहे. नातेवाईकांनी वारंवार प्रयत्न करूनही प्रशासनाचा असंवेदनशीलपणा दाखवला. त्यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. टेलिव्हिजनचा ‘हा’ फिट अभिनेता आधी होता 95 किलो; PHOTO सोशल मीडियावर व्हायरल न्यूज 18 लोकमतने हे वृत्त प्रसारीत केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर  9 तासांनंतर या रुग्णाला रुग्णालयात बेड मिळाला. सकाळी 11 वाजेपासून रमेश स्वान हे शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर फूटपाथवर पडून होते. अखेर प्रशासनाने रात्री या वृद्धाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्ण वाढीमुळे कोरोना रुग्णांचे होणारे हाल पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. Facebook Feature : आता तुमच्या पोस्टवर कोणी कमेंट करायची हे तुम्हीच ठरवा दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 937 विक्रमी रुग्णसंख्या नोंदली गेली आहे तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना हाहाकाराने प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या