मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपच्या महापौराचा पालिकेच्या पैशावर थाट, 11 लाखांची कार अन् स्पेशल नंबरसाठी उडवले 70 हजार!

भाजपच्या महापौराचा पालिकेच्या पैशावर थाट, 11 लाखांची कार अन् स्पेशल नंबरसाठी उडवले 70 हजार!

कोरोना ऐन भरात असताना अत्यावश्यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी चंद्रपूर महानगरपालिकेने नवीन गाडीची खरेदी का केली?

कोरोना ऐन भरात असताना अत्यावश्यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी चंद्रपूर महानगरपालिकेने नवीन गाडीची खरेदी का केली?

कोरोना ऐन भरात असताना अत्यावश्यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी चंद्रपूर महानगरपालिकेने नवीन गाडीची खरेदी का केली?

  • Published by:  sachin Salve
हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 15 जुलै: चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Municipal Corporation) महापौरांसाठी घेण्यात आलेल्या नव्या अल्फा नेक्सा (Alpha Nexa) गाडीला VIP नंबर मिळावा म्हणून महापालिकेने तब्बल 70 हजार रुपये RTO ला मोजल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी ही बाब समोर आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या महापौर राखी संजय कंचर्लावार (Mayor Rakhi Sanjay Kancharlawar) यांच्यासाठी एप्रिल महिन्यात सुमारे 11 लाखांची ही लक्झरी गाडी महानगरपालिकेकडून खरेदी करण्यात आली आणि विशेष म्हणजे 1111 हा खास नंबर मिळावा म्हणून तब्बल 70 हजार रुपये पालिकेच्या वतीने RTO विभागाकडे धनादेशाद्वारे खर्च करण्यात आले. टीम इंडियाला कोरोनाचा धोका वाढला! ऋषभ पंतनंतर आणखी एक जण पॉझिटिव्ह कोरोना ऐन भरात असताना अत्यावश्यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी चंद्रपूर महानगरपालिकेने नवीन गाडीची खरेदी का केली? आणि नवीन गाडीसाठी VIP नंबर मिळावा म्हणून जनतेच्या पैशाचे 70 हजार रुपये का खर्च केले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चंद्रपूरच्या महापौरांनी घेतलेल्या नव्या गाडीच्या अतिविशिष्ट क्रमांकाबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोकरी करणाऱ्यांना PNB देत आहे 3 लाखांचा लाभ, झिरो बॅलन्स असेल तरीही मिळतील पैसे 'मनपात भाजपची सत्ता असून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार सत्तापक्षाचे मार्गदर्शक आहेत. मनपा अथवा नगरपालिकेत सर्व आर्थिक अधिकार प्रशासनाकडे असल्याची आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका जनहितार्थ सूचना देण्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'अतिविशिष्ट क्रमांकासाठी पैसे मोजले असतील तर ती बाब प्रशासनाच्या कार्यकक्षेतील असून चौकशी करून चंद्रपूर मनपाच्या आयुक्तांकडून हे पैसे वसूल केले जावे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
First published:

Tags: BJP, Maharashtra, Mumbai, Pune

पुढील बातम्या