मुनगंटीवारांनी गड राखला ; चंद्रपुरात कमळ उमललं, काँग्रेसची धुळधाण

मुनगंटीवारांनी गड राखला ; चंद्रपुरात कमळ उमललं, काँग्रेसची धुळधाण

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला गड कायम राखत काँग्रेसला धोबीपछाड दिलाय.

  • Share this:

21 एप्रिल : चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केलीये. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला गड कायम राखत काँग्रेसला धोबीपछाड दिलाय.

चंद्रपूर महापालिकेच्या 66 जागासांठी सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पासून भाजपने आघाडी घेतली. आणि हीच आघाडी आतापर्यंत कायम आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 34 जागांचा आकडा भाजपने गाठला असून 35 जागांवर भाजप आघाडीवर आहे.  काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात. तर राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी 2 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेला 1 जागा आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्यात. चंद्रपूर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं होमग्राऊंड असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मुनगंटीवार यांच्यासह सर्वच भाजपच्या नेते आणि मंत्र्यांनी चंद्रपुरात प्रचाराचा धुराळा उडवला होता. भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे अखेर चंद्रपूरकरांनी भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या देऊ केल्या आहेत.

चंद्रपूर महापालिकेचा निकाल

भाजप -35

काॅंग्रेस - 12

राष्ट्रवादी -2

शिवसेना -2

मनसे -1

अपक्ष -2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 01:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading