Home /News /maharashtra /

कार थेट झाडावर धडकली, भीषण अपघातात नायब तहसीलदाराचा मृत्यू

कार थेट झाडावर धडकली, भीषण अपघातात नायब तहसीलदाराचा मृत्यू

शहरालगत चिचपल्ली मार्गावर कार अनियंत्रित होत झाडाला धडकली.

चंद्रपूर 7, जून : तहसील कार्यालय चंद्रपुरात कार्यरत नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शहरालगत चिचपल्ली मार्गावर कार अनियंत्रित होत झाडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये तहसीलदार अजय भास्करवार यांना आपला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त कारमध्ये अजय भास्करवार हे एकटेच असल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर अजय भास्करवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. सध्या या अपघाताप्रकरणी रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलताना आणल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील रस्ते अपघातात मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. मागील 24 तासांमधील हा तिसरा अपघात आहे. शनिवारी मुंबईत विरार इथे एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. विरार पूर्वेकडील मुंबई अहमदाबाद महामार्गवर शिरसाड फाटा इथे दुचाकी आणि टँकरची धडक झाली. केमिकलचा टँकर असल्याने धडक होताचा मोठा स्फोट होऊन आग लागली. दुसरीकडे, चांदवड-देवळा मार्गावरील भावड घाटात अज्ञात वाहनाने ट्रॅकटरला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या