संशयातून संसार उद्ध्वस्त ! पतीवर कुऱ्हाडीनं वार करून पत्नीची नदीत उडी

संशयातून संसार उद्ध्वस्त ! पतीवर कुऱ्हाडीनं वार करून पत्नीची नदीत उडी

पतीवर धारदार कुऱ्हाडीनं सपासप वार करून पत्नीनं नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 6 जून : पतीवर धारदार कुऱ्हाडीनं सपासप वार करून पत्नीनं नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीवर चारित्र्याचा संशय घेत पत्नीनं हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. चंद्रपुरापासून काही अंतरावर असलेल्या नकोडा येथील हा प्रकार आहे. अर्चना सोयाम आणि बबलू सोयाम अशी मृतांची नावं आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पती झोपेत असताना बुधवारी (5 जून)रात्री उशिरा  3 वाजण्याच्या सुमारास पत्नीने त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. यानंतर तिनं वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. या दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास घुग्गुस पोलीस करत आहेत.

वाचा अन्य बातम्या

'या' देशाला मदत न पाठवल्यास 20 लाख लोकांचा होऊ शकते मृत्यू!

SSC RESULT 2019 : 10वीचा निकाल आज? maharesult.nic.in इथे पाहा Result

SSC RESULT 2019 : 10 वीचा निकाल 'या' दिवशी maharesult.nic.in साईटवर होणार जाहीर.

VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार

First published: June 6, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading