मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंद्रपूरमध्ये नामांकित महिला कॉलेजमधील प्राध्यपकाला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक

चंद्रपूरमध्ये नामांकित महिला कॉलेजमधील प्राध्यपकाला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक

सुमारे 25 वर्षांपासून या महाविद्यालयात क्रीडा विषयाचा प्राध्यापक असे प्रकार विद्यार्थिनींसोबत वारंवार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे

सुमारे 25 वर्षांपासून या महाविद्यालयात क्रीडा विषयाचा प्राध्यापक असे प्रकार विद्यार्थिनींसोबत वारंवार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे

सुमारे 25 वर्षांपासून या महाविद्यालयात क्रीडा विषयाचा प्राध्यापक असे प्रकार विद्यार्थिनींसोबत वारंवार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 17 मार्च : चंद्रपूर शहरातील एका नामांकित महिला महाविद्यालयातील क्रीडा विषयाच्या प्राध्यापकाला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाच्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने क्रीडा प्राध्यापकासंदर्भात एक तक्रार व्यवस्थापनाकडे केली होती. व्यवस्थापनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना यासंदर्भात दखल देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, या प्रकरणात पोलिसांनी काळजीपूर्वक पावलं टाकत सुमारे 12 तास या प्रकरणातील तक्रारकर्ती विद्यार्थिनी-पालक यांचे जबाब नोंदवले. दरम्यान, या जबाबातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. सुमारे 25 वर्षांपासून या महाविद्यालयात क्रीडा विषयाचा प्राध्यापक असे प्रकार विद्यार्थिनींसोबत वारंवार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान हे महाविद्यालय सोडलेली एक विद्यार्थिनी या प्राध्यापकाच्या तक्रारीसाठी पुढे आली असून एकूण तक्रारकर्त्या विद्यार्थिनींची संख्या आता दोन झाली आहे. अत्यंत गुंतागुंतीचे हे प्रकरण चंद्रपूर पोलीस संवेदनशीलतेने हाताळत असून शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्यानं पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळली आहे. या प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी कलम 376 , पोक्सो आणि SC-ST अत्याचार प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमे लावण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याच महाविद्यालयातील इतर अन्य विद्यार्थिनी पीडित आहेत का याचाही तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या एका पथकाकडून सुरू आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शहरातील विद्यार्थिनी आणि पालक यांच्यात चिंता असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आपल्याच मुलीच्या 12 वर्षांच्या मैत्रिणीवर बापाने केले अत्याचार दरम्यान,चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आपल्या मुलीच्या 12 वर्षीय मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही पीडित मुलगी 4 महिन्याची गरोदर आहे.  दरम्यान, या पीडितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने चंद्रपूर आणि राज्यात खळबळ उडाली आहे. गावातीलच योगेश दोहतरे नामक आरोपीच्या घरी त्याच्या मुलीची 12 वर्षीय मैत्रीण यायची. तिच्यावर योगेशची नजर होती. ती घरी आली की, तो लगट करायचा आणि कुठं वाच्यता केली, तर जीवानिशी ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळं मुलगी घाबरून सगळं सहन करायची. याचा फायदा उचलत त्यानं लैंगिक अत्याचार सुरू केले. दोन दिवसांपूर्वी या मुलीचं पोट दुखत असल्यानं तिच्या आईनं डॉक्टरकडे नेलं आणि तपासात जे समोर आलं, त्यानं आई-वडिलांना धक्काच बसला. त्यानंतर हा सगळा प्रकार तिनं कथन केला. त्यावरून शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून आरोपी योगेश दोहतरे याच्याविरुद्ध पॉक्सो, 376 कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यासंबंधी विविध तपासण्या करण्यात आल्या आहे. चिमूर पोलिसांचे महिला पोक्सो पथक वहानगाव इथं तळ ठोकून आहे. या घटनेचं अधिक तपशील मिळवले जात आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Chandrapur

    पुढील बातम्या