मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गायीला वाचवताना भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, प्रसिद्ध डीजे वादकासह ४ जणांचा मृत्यू

गायीला वाचवताना भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, प्रसिद्ध डीजे वादकासह ४ जणांचा मृत्यू

डीजेचं सामान घ्यायला गेले आणि परतलेच नाहीत, रस्त्यात गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटला आणि....

  • Published by:  Kranti Kanetkar
प्रतिनिधी हैदर शेख, चंद्रपूर : रस्त्यात मध्येच आलेल्या गायीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. गायीचा जीव वाचवण्याच्या नादात गाडीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला आणि नको तेच घडलं. भरधाव बोलेरो ट्रकवर जाऊ आदळली. हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचा चुराडा झाला. ही हृदयद्रावक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर घडली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे याचाही मृत्यू झाला. चंद्रपूरहून डीजेसाठी आवश्यक असलेलं सामान घेऊन पंकज आणि त्याच्यासोबत बाकी तरुण निघाले होते. गडचिरोलीला जात असताना रस्त्यात रात्री गाय मध्येच आली. तिला वाचवण्याचे प्रयत्न करत असतानाच कार ट्रकवर आदळली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आपल्या डीजेतून कमी कालवधीत प्रसिद्धी मिळवलेल्या पंकजचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पंकजच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतांची नाव १) पंकज किशोर बागडे वय 26 रा.गडचिरोली, २) अनुप रमेश ताडूलवार वय 35 वर्ष रा.विहीरगाव ता.सावली, ३) महेश्ववरी अनुप ताडूलवार वय 24 वर्ष रा.विहीरगाव ४) मनोज अजय तीर्थगिरीवार वय 29 रा.ताडगाव या अपघातात एक जण थोडक्यात बचावला. आपल्यासोबतच्या चौघांचा मृत्यू झाल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. .याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published:

पुढील बातम्या